लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी वाईट का झाली? केवळ मोदी लाटेचा पुकारा करण्यापेक्षा अनेक नेते व मंत्र्यांनी मनापासून काम केले नसल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी आपल्या पक्षाचे मंत्री व आमदारांची मुंबईतील पक्ष कार्यालयात बैठक घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने मतदारांना सामोरे जायचे, याची या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.